अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- लग्नानंतर सासरवाडीस आलेल्या जावयाची उत्तम प्रकारे बडदास्त ठेवली जाते. त्यास काय हवे काय नको याची चांगली काळजी घेतली जाते.
मात्र सासरवाडीत आलेल्या जावयाला चक्क विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे.
माहेरी असलेल्या पत्नीला सासरी घेऊन जायला सासरवाडीत आलेल्या जावयाला चक्क विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयराम हनुमंत गिरी असे त्या जावयाचे नाव आहे. हि घटना अंबाजोगाईत घडली.
येथील रविवारपेठेत त्यांची सासरवाडी आहे. पत्नी पूजाशी त्यांचे बिनसले होते. त्यामुळे ती माहेरी आली होती. तिला घेण्यासाठी जयराम गिरी हे अंबाजोगाईला आले होते.
यावेळी ‘तू इथे का आला, आम्ही पूजाला तुझ्याकडे पाठविणार नाहीत’ असे म्हणत तिघांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली.
त्यानंतर त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडून बळजबरीने विषारी द्रव तोंडात ओतले. नंतर जयराम गिरी हे उपचार घेऊन बरे झाले.
त्यांच्या जवबाबावरुन आप्पा माणिक गिरी, माणिक गिरी व अलका गिरी यांच्याबर शहर पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला.