अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- मागील वर्षी पालघर जिल्ह्यात गैरसमज झाल्याने ‘मॉब लिंचिग’च्या प्रकारातून काही साधूचा मृत्यू झाला होता. जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे घटना घडल्यामुळे जामखेड तालुका हादरला आहे.
तालुक्यातील वंजारवाडी येथील संतप्त झालेल्या २०० ते २५० लोकांच्या जमावाकडून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील चौंघांना अरणगाव येथील स्टँडवर अमानुष मारहाण करण्यात आली आहे.
यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या बाबत समजलेली माहिती अशी की आष्टी येथील कोंबडी व्यावसायिक विशाल कांबळे ,व त्यांचे नातेवाईक असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे आणखी दोन नातेवाईक बरोबर घेऊन जामखेड तालुक्यात वंजारवाडी,
फक्राबाद, अरणगाव या भागात गावरान कोबंड्या विकत घेण्यासाठी आले होते. पुन्हा ते गावाकडे परत निघाले असताना वंजारवाडी येथे दिवसा घरफोडीची घटना घडली असल्यामुळ तेथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला.
अरणगाव येथे कांबळे यांच्या गाडीला वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी आडवी गाडी लावून गाडी थांबली आणि गाडीवर मोठ मोठे दगड घालून गाडी फोडून या चौघांना गाडीच्या खाली घेऊन गज, काठ्या, लोखंडी राँड, व दगडाने जबर मारहाण करुन गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून खिशातील पन्नास हजार रुपये काढून घेण्यात आले आहे.
या घटनेत विशाल काबंळे, कचरु निकाळजे,सुनील निकाळजे, किरण कांबळे हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे ३० जना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.