अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- नगर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. हे चोरटे कधी व काय चोरी करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे.
आता रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्याही चोऱ्या होत आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी महिलांचे मंगळसूत्र,नागरिकांचे घरफोडीकरून किमती ऐवज लांबवला होता.
मात्र आता तर थेट देवांकडेच मोर्चा वळविला असून चक्क देवच चोरुन नेल्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे. त्यामुळे आता या चोरट्यांपासून नागरिकच नव्हे तर जिल्ह्यातील देव देखील सुरक्षित राहिले नाहीत.
याबाबत सविस्तर असे की, अकोले तालुक्यातील पेड शेत गावात हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरात गवळी बाबांची मूर्ती असून तिच्यावर भाविकांनी १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकूट बनविलेला होता.
तो मुकूट त्याचबरोबर खंडोबा, वाघोबा, श्री शंकर भगवान व कळसुबाई देवीची चांदीच्या पत्र्यात नक्षीकाम करुन तयार केलेल्या मूर्तीच अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे लंपास केल्या आहेत.
थेट देवाच्या मर्तीच चोरीला गेल्याने या ा परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.