शिरूरमध्ये रविवारी रंगणार PRD च्या अंतीम सामन्याचा थरार डान्सींग अंपायर गोटया यांचे आकर्षण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-  शिरूर शहराची क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रयत संस्थेच्या क्रीडांगणावर सुरू असणाऱ्या व शिरूरचे माजी नगराध्यक्ष श्री . रवि उर्फ शाम मनोहर ढोबळे यांनी आयोजीत केलेल्या भव्यदिव्य PRD चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेच्या अंतीम सामन्यांचा थरार उद्या रविवार दि .१४ रोजी रंगणार आहे .

कै .केशरसिंग खुशाल सिंग परदेशी व उद्योगपती कै .रसिकलालजी माणिकचंद धारीवाल या दोन मित्रांच्या समरणार्थ प्रकाशशेठ रसिकलालजी धारीवाल अर्थात PRD चषक स्पर्धेचा प्रारंभ दि .९ फेब्रु पासून या स्पर्धेस प्रारंभ झाला . या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत १६ संघांना प्रवेश देण्यात आला .

गणेश जाधव ,उस्मान पटेल , कृष्णा सातपुते , इजाज कुरेशी , ओंकार देसाई , धनंजय भिंताडे, भूषण मुळे , किरण मोरे , कृष्णा पवार , सतीश पठारे ,अंकीत सिंग , कल्याण गोरे , कुणाल खोंड, किरण चौगुले असे महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू आयकॉन म्हणून या स्पर्धेत खेळत आहे .

एक उत्तम स्पर्धेची व खेळाडूंची मेजवाणी या निमित्ताने शिरूरकरांना उपलब्ध करून दिली आहे . उद्या रविवारी या स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे . आज सुपर एटचे सामने अत्यंत चुरशीने खेळले गेले . यशवंत पाचंगे वाघोली , फिरोजभाई शेख तिरंगा हॉटेल न्यू स्टार एलेव्हन,

रंगनाथ शिंदे साईराम इलेव्हन व फिरोजभाई बागवान शिवसागर लिजन्ट जुन्नर या चार संघांनी अष्टपैलू खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे . उद्या या चार संघातून PRD चषक २०२१ स्पर्धेचा मानकरी ठरणार आहे . या संपूर्ण स्पर्धेचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूस स्प्लेंडर गाडी बक्षीस मिळणार आहे .

या स्पर्धेचे युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे . अंतीम दिवशी डान्सींग अंपायर गोटया यांचे आकर्षण असणार आहे . बक्षीस वितरण समारंभासाठी उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल , आमदार अशोक पवार , आमदार निलेश लंके ,उद्योगपती आदीत्य धारीवाल , ऋषीराज पवार ,शैलेश मोहीते राष्ट्रीय सरचिटणीस राष्ट्रवादी कॉंग्रेस ,

नगराध्यक्ष वैशाली वाखारे, आजी माजी नगरसेवक व अनेक मान्यवर उपास्थित राहणार आहेत . अंतीम दिवसाचे मुख्य आकर्षण असणार आहेत त्या मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकर. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य संयोजक माजी नगराध्यक्ष रवि ढोबळे , शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे व सर्व मित्र परीवार परिश्रम घेत आहेत .

अहमदनगर लाईव्ह 24