अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- महिलांना हाय हिल्स म्हणजेच उंच टाच असलेली चप्पल घालणे आवडते. उंच टाच असलेले सॅन्डल किंवा चप्पल महिलांच्या व्यक्तिमत्वात भर घालतात. महिलांना पार्टी किंवा फंक्शनमध्ये हाय हिल्स घालायला आवडतात.
पण तुम्हाला माहीत आहे का हाय हिल्स वापरण्याचे अनेक दुष्परिणाम असतात. जर तुम्ही जास्त वेळ हील्स घातलीत , तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
जाणून घ्या हाय हिल्स घालण्याचे तोटे पाठीच्या खालच्या भागात दुखणे- हाय हिल्स घालणे पायांना सामान्य सॅन्डल किंवा सपाट पादत्राण्याएवढा आराम देत नाही. हे पायांना पूर्ण आधार देत नाही, ज्यामुळे पाठीत वेदना, सूज आणि कडकपणा येऊ लागतो.
पाय दुखणे- हाय हिल्स जास्त काळ घातल्याने तुम्हाला तुमच्या पायाची बोटं, तळवे, टाचांमध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात. पाठीचा कणा- हाय हिल्स घातल्याने शरीराच्या वरच्या आणि खालच्या कमानीमध्ये वेदना होऊ शकतात.
गुडघेदुखी- हाय हिल्सचे सँडल घातल्याने मणक्याचे नुकसान होण्याचा धोका कायम राहतो. तसेच, हाय हिल्स सँडल घातल्याने गुडघ्यांवर खूप दबाव येतो, ज्यामुळे हाय हिल्स घालणारे अनेकदा गुडघेदुखीची तक्रार करतात.