अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोरोना व्हायरसने जगभरात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले आहे. यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक देशांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
त्यामुळे जगभरातील लोक चिंतेत जगत आहे. तर दुसरीकडे चीनमधून एका नवीन व्हायरसची बातमी समोर येत आहे. ‘मंकी बी’ या व्हायरसमुळे चीनमध्ये पहिला मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा फैलाव माकडापासून होत असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे चीनमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टराचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस किती धोकादायक आहे याचा अंदाज त्याच्या संसर्गानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणावरुन होईल. याचे प्रमाण 70 ते 80 टक्के आहे.
या व्हायरसमुळे बीजिंगमधील एका पशुवैद्यकीय डॉक्टराचा मृत्यू झाला असून या व्हायरसचे हे पहिलेच प्रकरण आहे. मृतक डॉक्टराच्या संपर्कात आलेले सर्व जण अद्याप सुरक्षित आहे. मृतक डॉक्टर हे 53 वर्षाचे असून ते एका संस्थेत नॉन-ह्यूमन प्राइमेट्सवर संशोधन करत होते.
मार्च महिन्यात त्यांनी दोन मृत माकडांवर संशोधन केले त्यानंतर डॉक्टरामध्ये मळमळ आणि उलटी हे प्राथमिक लक्षण दिसून आले. त्यांच्यावर अनेक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. परंतु, 27 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला.
आयसीएमआरचे माजी सल्लागार डॉ. व्हीके भारद्वाज म्हणतात की, हर्पस बी व्हायरस किंवा मंकी बी व्हायरस हे प्रामुख्याने प्रौढ माकडांपासून संक्रमित होतात. यावितिरिक्त, हा व्हायरस रीसस मॅकॉक,
डुक्करांसारखी शेपूट असणाऱ्या माकडापासून आणि सायनोमोलगस माकड किंवा लांब-शेपटी असणाऱ्या माकडांपासूनदेखील या व्हायरसचा फैलाव होतो. हा व्हायरस क्वचितचपणे माणसांमध्ये आढळून येतो.
परंतु, भारतातील माकडांमध्ये हे व्हायरस सध्या अस्तिवात नाही. जर कोणताही व्यक्ती या व्हायरसने संक्रमित झाला तर त्याला मेंदूची समस्या उद्भवू शकते असे भारद्वाज यांनी सांगितले.