कचरा डेपोच्या धुराने गुदमरला दरेवाडीकरांचा श्वास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- दरेवाडी येथे असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा डेपोने दरेवाडीकरांचे आरोग्य धोक्यात आणले आहे.

दोन दिवसांपासून येथील कचरा डेपो पेटला असून त्याच्या धुराने परिसरातील लोक गुदमरत आहेत. वारंवार मागणी करूनही कॅन्टोन्मेंट मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.

दरेवाडी येथे अनेक वर्षांपासून कॅंटोनमेंट बोर्डाचा (छावणी परिषद) मोठा कचरा डेपो आहे. भिंगारसह छावणी परिषद परिसरातील सर्व कचरा दररोज येथे आणून टाकला जातो.

शेकडो टन हा कचरा येथील खुल्या मैदानात कोणतीही प्रक्रिया न करता अस्तावस्त खाली केला जातो.

वार्‍यामुळे हा कचरा परिसरातील लोकांच्या घरात घुसतो. अनेकदा कचरा भेटण्याच्या घटनाही घडतात. गेल्या दोन दिवसांपासून येथील कचरा पेटला असून रात्रंदिवस परिसरातील लोकांच्या घरात धुराचे लोट जात आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घरात रुग्ण आहेत, लहान मुले आहेत. त्यांना या धुरामुळे श्वास घेणे मुश्कील झाले आहे. परिसरातील नागरिकांनी अनेकदा कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत किंवा हा कचरा डेपो इतरत्र हलवण्याबाबत मागणी केली.

मात्र कॅंटोन्मेंट बोर्डाने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. सध्या कोरोनाच्या काळात नागरिकांना मुख्यता श्वसनाचा त्रास होत असताना,

आणि रुग्णालयामध्ये ऑक्सिजनअभावी रुग्ण मरत असताना येथे मात्र कचरा पेटवून आहे तो ऑक्सिजन दूषित करण्याचे काम सर्रास होत आहे.

दरेवाडी येथे असलेल्या या भल्यामोठ्या कचरा डेपोची योग्य विल्हेवाट लावली जाते का किंवा तेथील कचरा २-२ दिवस कसा धगधगत राहतो.

त्यातून पर्यावरणाची हानी होत नाही का? याबाबत याबाबत पर्यावरण विभागाचे अधिकारी अनभिज्ञ असून त्यांनी या डेपोला अद्यापही भेट दिली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24