अहमदनगर जिल्ह्यात ह्या ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन सुमारे चार तोळे सोन्यासह १०० ग्रॅम चांदीच्या वस्तू व रोख २५ हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना नेवासा शहरात घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रभा प्रकाश मोदी (वय ४८, धंदा मजुरी, रा. नेवासा खुर्द) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी व माझा मुलगा स्वप्नील असे आमचे नातेवाईकांना भेटण्याकरीता सकाळी ९ वाजण्याचे सुमारास आमचे राहते घराला कुलुप लावून जळगाव (जि. जळगाव) येथे गेलो होतो.

त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ च्या सुमारास माझा भाचा ओंकार माणिक मापारी याने फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे. तेव्हा मी त्याला घरामधे जावून खात्री करण्यास सांगितले असता त्याने मला सांगितले की,

घरातील सामानाची उचकापाचक झालेली असून सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत आहेत. तेव्हा आमचे घरी चोरी झाल्याचे आमचे लक्षात आले. त्यानंतर मी व माझा मुलगा स्वप्नील जळगावहून नेवासा येथे आमचे घरी येवून पाहीले असता आमचे घराचे दरवाजाचे कडी-कोयंडा तुटलेला दिसला.

मी व मुलगा स्वप्नील असे आम्ही घरात जावून पाहीले असता माझे दागीने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम पुढीलप्रमाणे ९ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक तोळ्याचे (१० ग्रॅम) एक सोन्याचे लॉकेट, ८ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे नेकलेस,

६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पळ्या, दोन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या नथी, दीड ग्रॅम वजनाचे सोन्याचे २५ मणी, अडीच ग्रॅम वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बाळ्यांचे दोन जोड, १०० ग्रॅम (दहा भार ) वजनाच्या चांदीच्या वस्तू,

२५ हजार असे रुपयांची रोख रक्कम, एकूण ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू व २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.