अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र सरकारने राज्यभरात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला होता. त्यामुळे राज्यात गोमांस बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. तरीही गोमसन तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

नुकतेच श्रीरामपुरात पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. श्रीरामपूर शहरातील बिफ मार्केटच्या मागे आरोपी दाऊद अजीज कुरेशी,

(रा. कमिटी मज्जित जवळ,भारत नगर, मुंबई (सध्या राहणार- फातिमा हाउसिंग सोसायटी,श्रीरामपूर)याला एक लाख 65 हजार रुपये किमतीच्या गोवंश जातीच्या जनावराचे गोमांस बाळगताना पोलिसांनी पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये दाऊद याच्याकडे एक मोटारकार देखील मिळून आली आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई अमोल गायकवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बैसाणे हे करीत आहे.