राष्ट्रवादीच्या आमदारावर दिवसाढवळ्या गोळीबार; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाच्या गेटवर आज दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान गोळीबार झाला असला तरी सुदैवाने आमदार बनसोडे हे सुखरूप आहेत. पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे.

याच परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर ३ राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे.

या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले आहेत. आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा,

असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24