अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते.
अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादायी आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी केंद्रीय मंत्री असलेले स्व.दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमातच अंत्यसंस्कार करणे हा प्रोटोकॉल आहे.
याबाबत जिल्हाधिकरींकडे विचारणा करून त्यांना शासनाचा अध्यादेश पाहायला लावणार आहे, असे मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून सुवेंद्र गांधी व कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. स्व. गांधी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र नागावडे, संपतराव म्हस्के, शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, अभिजित लुणिया, मनोज गुंदेचा आदी उपस्थित होते.