पोलिसात तक्रार केल्याने जीवे मारण्याची धमकी व जातीवाचक शिवीगाळ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  पिंपरी कोलंदर ता श्रीगोंदा येथील सुरेश बबन शेंडगे यांच्या रमाबाई घरकुल योजनेअंतर्गत त्यांना घरकुल मिळालेले आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेत घरकुलासाठी ओटा (पाया) बांधलेला आहे.

गावातील आरोपींची स्वतःची जागा दुसरीकडे असून ते मागासवर्गीय समाजाचे सुरेश शेंडगे यांना जाणून बुजून त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करतात कारण शेंडगे यांची जागा रोडवर आहे त्यामुळे आरोपी यांनी त्याच्या राहत्या घरापाशी अतिक्रमण केले असल्याने शेंडगे यांना येणे जाण्यास त्रास होत आहे

घराच्या पाया जवळ संतोष काळे यांनी जेसीबीच्या साह्याने मोठा खड्डा खोदला आहे या जागेत त्यांचा कुठलाही संबंध नसताना देखील खड्डा खोदून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे ठरवले असून आम्ही याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनला 23 जुलै रोजी जाऊंन विठ्ठल ढोरजकर, रावसाहेब ढोरजकर, संतोष काळे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली असता

परंतु बेलवंडी पोलीस स्टेशन या बाप्तीचे उडवाउडवीचे उत्तर देऊन आरोपीवर कारवाई करत नाही दरम्यान तिने मनुवादी यांनी शेंडगे यांना जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्या निषेधार्थ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले

यावेळी संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे, लहुजी शक्ती सेनेच्या अध्यक्ष संतोष शिंदे, गुरुबाबा लोंढे आदी उपस्थित होते. शेंडगे यांना त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले अन्यथा 16 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे अमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24