शिर्डीतील जम्बो कोविड सेंटरऐवजी या सेंटरचे विकेंद्रीकरण करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

यातच रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जिल्ह्यातील शिर्डी येथे चार हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करता येईल असे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे.

मात्र सुरु होण्यापूर्वीच कोविड सेंटरला अडथळे निर्माण होऊ लागले आहे. शिर्डीत उभारण्यात येणार्‍या 4200 खाटांचे जम्बो कोविड सेंटरऐवजी या सेंटरचे विकेंद्रीकरण करून सध्या या तालुक्यात सुरू असलेल्या कोविड सेंटरमध्ये थोड्याफार प्रमाणात खाटांची संख्या वाढवावी.

तसेच साईबाबा संस्थांनने या ठिकाणी मदत करावी, अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जम्बो रुग्णालय आजूबाजूच्या दहा तालुक्यांसाठी विचारात घेऊन केले जात आहे.

परंतु रुग्णालयाचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे आहे. त्यापैकी संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर येथे पाचशे खाटांच्या रुग्णाची व्यवस्था सध्या चालू आहे.

त्यातच थोड्याफार प्रमाणात वाढ करण्यात यावी. गरज पडल्यास साईबाबा संस्थांनने मदत करावी. जेणेकरून कोणत्याही एका ठिकाणी कामाचा व्याप वाढणार नाही.

तर शिर्डी करोना रुग्णांचा हॉटस्पॉट होईल :- तसेच शिर्डी जवळपास 45 हजार लोकसंख्येचे शहर असून लवकरात लवकर येथे लसीकरण केंद्र चालू करणे गरजेचे आहे. शिर्डीत इतके मोठे सेंटर सुरू झाल्यावर शिर्डी करोना रुग्णांचा हॉटस्पॉट होईल.

या भीतीने ग्रामस्थांमध्ये आणि संस्थान कर्मचार्‍यांमध्ये सुद्धा दहशतीचे वातावरण आहे. तरी आमच्या सूचनांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24