अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- तुम्ही तुमचा डबा नेमके कोणाला जोडायचा हे ठरवा, आम्हाला जोडला तर फायदाच होईल, अशी कोपरखळी आमदार राधाकृष्ण विखे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मारली. त्यावर मुरकुटे यांनीही उत्तर देत जे इंजिन पॉवरफुल असेल त्यालाच आम्ही आमचा डबा जोडणार आहोत,असे मिश्कील उत्तर दिले.

उक्कलगाव येथे एका कार्यक्रमासाठी आमदार राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी त्यांनी अनेक चौकार षटकार मारीत एकमेकांच्या विकेट काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विखे व मुरकुटे यांची युती झाली होती.

त्यानंतर अनेक कार्यक्रमात ते एकत्रित दिसत होते. सर्व निवडणूका एकत्रित लढवन्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र मध्यंतरी झालेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोघांची सहमती तुटली.

माजी आमदार भानुदास मुरकुटे हे बाळासाहेब थोरातांच्या सहकार्याने बिनविरोध संचालक झाले. पूर्वी मुळा प्रवरेच्या शेअर्स किमत ५० रुपये होती. ती आता वाढवून २०० रुपये करण्यात आली आहे.

मात्र ज्यांचे शेअर्स ५० रुपयांचे आहेत. त्यांनाही निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. आपल्याला मुळा प्रवरा पुन्हा सुरू करावयाची आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभा बोलवा, अशी मागणीही माजी आमदार मुरकुटे यांनी केली.

अहमदनगर लाईव्ह 24