Maharashtra News:मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी अपूर्ण राहील.
त्यामुळे ती आता १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत राऊत यांना कोठडीत रहावे लागणार आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होती.
त्यासाठी त्यांना सकाळीच न्यायालयात आणण्यात आले होते. मात्र, वेळेअभावी राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज तहकूब करण्यात आली. ती आता १७ ऑक्टोबरला होणार आहे.
न्यायालयात नेताना प्रसारमाध्यमांनी राऊत यांना गाठले. त्यावेळी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यासंबंधी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, शिवसेनेचं नवं चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल.
यापूर्वी देशात ज्या पक्षांची चिन्ह गोठवण्यात आली, ते पक्ष पुढे जाऊन मोठे झाले. आम्हीदेखील तसेच मोठे होऊ. आमच्यात असलेलं शिवसेनेचं स्पिरीट (इच्छाशक्ती) अजूनही हाय आहे.
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने आम्हाला कोणातही फरक पडत नाही. आम्ही नव्या जोमाने काम करु. आम्ही पक्षाचे नवे चिन्ह आणि पक्षाचे नवीन नाव लोकांपर्यंत पोहोचवू,