निर्णायक सामना : इंग्लंडला विजयासाठी ३३० धावांचं आव्हान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भारत आणि इंग्लड संघात आज वनडे मालिकेचा तिसरा व अखेरचा सामना खेळला जात आहे.

एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारतीय संघानं इंग्लंडसमोर विजयासाठी ३३० धावांचं आव्हान ठेवलं आहे.

इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली.

संघाच्या १०३ धावा झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. यानंतर लगेचच शिखर धवन व कर्णधार विराट कोहली देखील माघारी परतले.

भारतीय संघाच्या चांगल्या सुरुवातीनंतरही लागोपाठ तीन फलंदाजांना माघारी धाडण्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंना यश आलं होतं.

त्यानंतर रिषभ पंतनं कोणताही दबाव निर्माण न होऊ देता आपल्या आक्रमक खेळीनं इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

रिषभनं केवळ ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांच्या साथीनं ७८ धावांची खेळी साकारली. हार्दिक पंड्यानं चांगली साथ देत ४४ चेंडूत ६४ धावा कुटल्या.

गेल्या सामन्यात शतकी कामगिरी करणारा केएल राहुल या सामन्यात अपयशी ठरला. लिव्हिंगस्टनच्या फुलटॉस चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल अवघ्या ७ धावांवर माघारी परतला.

अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरनं २१ चेंडूत ३० धावा केल्या. कृणाल पंड्यानं ३४ चेंडूत २५ धावांचं योगदान दिलं.

दरम्यान, अत्यंत चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाचा फलंदाजी क्रम घसरला आणि यजमान संघाने अवघ्या १५७ धावांवर चार विकसित गमावल्या. अशास्थितीत,

पंतने हार्दिक पांड्याच्या साथीने संघाचा डाव सावरत ९९ धावांची भागीदारी केली. या दरम्यान पंतने षटकार खेचत स्टाईलमध्ये वनडे करिअरमधील तिसरे अर्धशतक देखील पूर्ण केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24