मोबाईलच्या फाईव्ह जी टॉवर विरोधात नागरिकांनी उभारली तळतळाट काळी गुढी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- शहरातील धर्माधिकारी मळा परिसरात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी मोबाईलचे फाईव्ह जी टॉवर उभारले जात आहे.

याला स्थानिक नागरिकांचा विरोध असून, मोबाईल टॉवरमुळे नागरिक, पशु-पक्षी यांचे आरोग्य धोक्यात आले असताना टॉवर उभारणार्‍यांना लोककर्कासूर घोषित करुन नागरिकांनी तळतळाट काळी गुढी उभारली.

तर मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिमण्या वाचविण्यासाठी पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसदच्या वतीने राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी अभियानचे प्रारंभ करण्यात आले.

धर्माधिकारी मळा येथे झालेल्या या प्रबोधनात्मक आंदोलनात लहान मुलांनी कागदावर चिमण्यांची चित्रे रेखाटून चिमणी वाचवा मोबाईल टॉवर हटवाचा संदेश दिला. तर महिलांनी एकत्र येत काळी गुढी उभारली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती,

ललिता गवळी, वसुधा शिंदे, माधवी दांगट, ताराबाई तांबे, संध्या पवार, शिल्पा कुलथे, विठ्ठल सुरम आदी उपस्थित होते. दाट लोकवस्तीच्या भागात मोबाईल टॉवर उभारण्याच्या विरोधात संघटनेने आंदोलन सुरु केले असून, याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय बाल पक्षी चिमणी अभियान सुरू करण्यात आले आहे.

शहरात उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे मोठ्या प्रमाणात चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लहान बाळांना असताना आई चिऊ, कावळ्याच्या गोष्टी व कविता ऐकवित असते. मात्र मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे हे पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

पशु-पक्षी पर्यावरणाचे घटक असून, अशा मोबाईल टॉवरमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या चुंबकीय लहरींची तीव्रता अधिक असून, मनुष्य जीवनावर देखील विपरीत परिणाम होऊन आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची भिती निर्माण झाली असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी सांगितले.

धर्माधिकारी मळा परिसरात जागा मालक पैसे कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारत आहे.

तर पैसे घेऊन महापालिकेतील संबंधित अधिकारी त्याला परवानगी देत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. हे मोबाईल टॉवर उभारणारे लोककर्कासूर असल्याची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –

Ahmednagarlive24 Office