ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास श्वसन यंत्रणेसह मेंदूवरही परिणाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना आॅक्सिजन पातळीत घट होण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशातच श्वसन यंत्रणेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत आहे.

मेंदूचं सीटी स्कॅन केल्यानंतर ग्रे मॅटरची मोजणी करण्यात आली, त्यात ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाचा श्वसनावरच नाही तर मेंदूवरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे.

जॉर्जियातील एका विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. कोरोनामुळे आॅक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये ही बाब जास्त दिसून आली आहे.

या रुग्णांमध्ये भ्रम निर्माण होणे, अचानक मानसिक स्थिती बदलणे अशा समस्या समोर येत आहेत. आॅक्सिजनच्या कमतरेतमुळे मेंदुतील ग्रे मॅटर कमी झाल्यानं असं होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ग्रे मॅटर आपल्या मेंदूतील नर्वस सिस्टमचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. मसल्स कंट्रोल, स्पर्श जाणवणे, बघणे, ऐकणे, आठवण, आपल्या भावना, बोलणं, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास या सारख्या गोष्टी अवलंबून असतात.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24