वाहनाच्या धडकेत हरीण ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार झाले. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

कासारे शिवारात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राण्यांची भटकंती सुरु असते. मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास एक हरीण रस्त्यावर आले असता त्यास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.

त्यात अपघातात हरिणाचा एक पाय मोडला. येथील रघुनाथ दिघे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जखमी हरणास रस्त्याच्या बाजूला झाडाखाली नेऊन पाणी पाजले.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दिघे येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक राधाकिसन दिघे, चंद्रभान हापसे,

संजय डोंगरे, प्रभाकर जोरी, राम गायकवाड यांनी त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत हरीण मृत्यूमुखी पडले होते.

वनपाल किसन काळे या घटनास्थळी येऊन हरणाचा मृतदेह ताब्यात घेत निंबाळे रोपवाटिकेत हलविला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24