आईला सांभाळतो म्हणून नवऱ्यासह दीर,सासूला पत्नीच्या माहेरच्या मंडळीकडून मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :-  नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला संभाळतो, तो तिचेच ऐकतो. म्हणून पत्नीच्या सासरकडच्या लोकांनी नवरा, दिर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत

त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतलयाची घटना राहुरी फॅक्टरी येथे दिनांक २३ जुलै रोजी घडली असून याबाबत मंगळवार 27 जुलै रोजी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुरी फॅक्टरी येथील निलेश लांडगे याची पत्नी ही वयोवृद्ध सासूला संभाळायचे नाही. नवरा सर्व काही सासूचे ऐकतो. या कारणावरुन काही दिवसांपासून नांदत नव्हती. दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान निलेश अनिल लांडगे याच्या घरी पत्नीच्या माहेरचे मंडळी आले.

त्यांनी निलेश लांडगे याची आई व भावास लाथा बुक्क्यांनी तर वयोवृद्ध आईला काठीने मारहाण करून तिचे गळ्यातील पोत बळजबरीने तोडुन घेतली. त्यावेळी निलेश लांडगे तुम्ही आई व भावास मारहाण करू नका. त्यावेळी आरोपींनी तू आईला सांभाळायचे नाही. असे सांगुन सुध्दा तू आईला का सांभाळतो.

असे म्हणुन त्यांनी निलेश लांडगे याला गजाने मारहाण केली. तसेच त्याच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची चैन बळजबरीने तोडुन घेतली. आणि घरातील संसार उपयोगी सामान, लाकडी कपाट, लोखंडी कपाटातील सामान काढुन अस्ताव्यस्त फेकुन दिले. तसेच टिव्ही व मोबाईल फोडुन नुकसान करून जिवे मारण्याची धमकी दिली.

निलेश अनिल लांडगे याच्या फिर्यादीवरून आरोपी जितेंद्र नारायण भुजंगे, रविंद्र नारायण भुजंगे, नारायण बापुराव भुजंगे, वच्छलाबाई नारायण भुजंगे, सिमा निलेश लांडगे तसेच एक अनोळखी महिला सर्व राहणार नेकनुर जि. बीड. या सहा जणांवर मारहाण व लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय

अहमदनगर लाईव्ह 24