अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- देवळाली प्रवरा येथील आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर चालकांवर सोशल मिडीया व वृत्तपञातुन चिखल फेक करुन बी.ए.एम.एस डाँक्टर्सची बदनामी करणे. डाँक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण बेताल वक्तव्य करणाऱ्या आप्पासाहेब ढुस याच्यावर दोन दिवसाच्या आत कायदेशिर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल.
सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देवून तालुक्यातील निमा संघटनेने वतीने जाहिर निषेध करुन प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप यांच्यासह तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ढुस याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केली आहे.
देवळाली प्रवरा येथिल आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यात राजकीय कलगितुरा सुरु असताना राजकीय कलगितुरा बरोबर वैयक्तिक चिखलफेक केल्याने कोविड सेंटर चालक डाँ.भास्कर सिनारे यांच्या अधिपत्याखाली डाँ.सचिन चौधरी, डाँ.भागवत विर, डाँ.प्रविण कोठुळे यांनी आँक्सीजनयुक्त कोविड सेंटर सुरु केले.
परंतू हे कोविड सेंटरच्या जागी शासकीय कोविड सेंटर सुरु करण्याची मागणी करताना आप्पासाहेब ढुस या नागरिकाने सोशल मिडीया व वृत्तपञातुन बेताल वक्तव्य करीत बी.ए.एम.एस पदवीधर व पदव्युत्तर एम.डी व एम.एस डाँक्टर्स बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्याचा निषेध करुन निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची मागणी निमा संघटनेनी केली आहे.
देवळाली प्रवरा येथील ढुस या व्यक्तीने अज्ञानाचे प्रदर्शन करत वृत्तपञातून व सोशल मिडीया मधुन बेताल वक्तव्य केले आहे.या व्यक्तीचा वैद्यकीय क्षेञाशी कोणताही संबध नसताना बी.ए.एम.एस पदवीधर व पदव्युत्तर डाँक्टरांच्या अधिकाराबद्दल वृत्तपञ व सोशाल मिडीया मधुन मानहानीकारक व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केले आहे.
अशा लोकांमुळे समाजामध्ये वैद्यकीय क्षेञाविषयी तेढ व वैद्यकीय सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.या लोकांमुळे समाजामध्ये डाँक्टरांविषयी गैरसमज निर्माण होतो. अवैद्यकीय व्यक्तीने वैद्यकीय माहिती न घेता वैद्यकीय क्षेञाविषयी कोणतीही विधाने करु नये.
जागतिक कोव्हिड महामारीच्या कठीण प्रसंगी डाँक्टर स्वतःचा जीव धोक्यातघालुन काम करत असताना महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने कार्यरत असलेले बी.ए.एम.एस. डाँक्टरांचे मनोधैर्य खच्चीकरण बेताल वक्तव्य करणाऱ्या ढुस याच्यावर दोन दिवसाच्या आत कायदेशिर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तालुकाभर निषेधात्मक बेमुदत बंद पाळण्यात येईल.
सर्व खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात येईल. निमा संघटनेच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालयात प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना निवेदन देवुन मागणी केली आहे. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष प्रसाद ढुस, डाँ.जयंत कुलकर्णी, डाँभागवत विर, डाँ.प्रविण कोठुळे,डाँ.प्रकाश पवार, डाँ.सचिन चौधरी, डाँ.नरेंद्र इंगळे,
डाँ.किशोर पवार, डाँ.मंगेश कुंभकर्ण,डाँ.अनिल तनपुरे,डाँ.किशोर खेडकर, डाँ.अमोल विटनोर,डाँ.किशोर सोनवणे, डाँ.हर्षद चोरडिया,डाँ.रवि घुगरकर,डाँ.किशोर वाघमारे,डाँ.अजय खेडकर, डाँ.भाग्यवान, डाँ.शेकोकर आदी उपस्थित होते.