अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी मनाची शक्ती वाढवा. त्यासाठी प्राणायाम, ध्यान, भजन, नामजप, चांगले वाचन, चांगले श्रवन यापैकी काही तरी करा. चांगले छंद जोपासा.
कोरोनाला घाबरण्यापेक्षा शासन नियम सांभाळून त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन सद्गुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव महाराज मंडलिक यांनी हिंदू नववर्षाच्या शुभारंभप्रसंगी नागरिकांसह भाविक भक्तांना केले आहे.
पत्रकात उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, की कोरोनाचं हे भयंकर संकट लवकर दूर करण्यासाठी आपण सर्वजण नववर्षाचा संकल्प करूया, आम्ही मास्क, सॅनिटायझरचा नित्यनेमाने वापर करून एकमेकांमध्ये अंतर राखण्यासाठी काटेकोर पालन करू,
बाहेर अकारण जाणार नाही, यांचादेखील निश्चय यानिमित्ताने करावा, असेही सूचित केले आहे. आजाराची लक्षणे जाणवल्यास तात्काळ कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी पुढे आले पाहिजे.
ही तयारी नागरिकांनी ठेवावी, शासन नियमांचे पालन केल्यास कोरोना हा आजार नक्कीच बरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आम्ही घाबरणार नाही पण काळजी घेऊ, दक्ष राहू, स्वत:ला, कूटूंबाला व समाजाला सुरक्षीत ठेवायचे की संकटात लोटायचे, हे आपल्याच हातात आहे.
येणारे उत्सव, सोहळे, सण कार्यक्रम हे घरातच साजरे करूया, असा संकल्प नववर्षाच्या निमित्ताने करूया. बाहेर परिस्थीती खूपच कठीण आहे, तेंव्हा घरी रहा, सुरक्षीत रहा.
नियम पाळा आणि आपल्या कुटूंबासेबत मजेत आनंदात रहा, असा संदेश देऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सकस आहार व योग्य तो व्यायाम करा,
मनाची शक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम, ध्यान, भजन, नामजप, चांगले वाचन, चांगले श्रवण यापैकी काही तरी करा.
चांगले छंद जोपासा, कोरोनाला घाबरण्यापेक्षा नियम सांभाळून त्याला पराभूत करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही उद्धव महाराज मंडलिक यांनी नागरिकांना व भक्तांना केले आहे.