अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- सोनई येथील हनुमानवाडी परिसरातील शनिचौक येथे भरदिवसा युवकावर जुन्या वादाच्या कारणावरून प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या मारहाणप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीस अटकही करण्यात आली.
परंतु गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करण्यात येऊन २४ तासांनंतर गुन्हा दाखल केला. सागर रामचंद्र कुसळकर (हनुमानवाडी शिवार) असे जखमीचे नाव आहे.
कुसळकर यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे, अमोल अशोक गडाख (सर्व सोनई),
अक्षय रामदास चेमटे (घोडेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल शिंदे यास अटक करण्यात आली असून अन्य आरोपी इतर गुन्ह्यात असल्याने अटक नाही.