अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- भारतात अव्वल असलेल्या व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टोयोटाच्या नवीन फॉर्च्युनर लिजेंडर वाहनाचे वितरण केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
वाहनाची पहिली डिलेवरी चेतन पोपटलाल भळगट यांना देण्यात आली. यावेळी शोरुमचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दिपक जोशी, लोकेश मेहतानी, मुजाहिद (भा) कुरेशी, राजशेठ सातपुते, विजय भुतकर आदी उपस्थित होते.
टोयोटाची नवीन फॉर्च्युनर लिजेंडर सर्वच कार प्रेमींना भुरळ घालत आहे. यामध्ये आनखी नवीन बदल करुन ग्राहकांना अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
यामध्ये वाइड रेडिएटर ग्रिल बंम्पर, न्यु डिझाईन शार्प एलईडी हेड लॅम्प अॅण्ड फॉग लॅम्प, सिक्वेंशियल इंडिकेटर्स, डे रनिंग लॅम्प (डीआरएल), स्मार्ट की, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड पॉवर बॅक डोअर अॅण्ड जॅम प्रोटेक्शन,
ड्युल टोन ब्लॅक रुफ, सुपिरीयर सीट, वेंटिलेशन सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ड्राईव कंट्रोल या नवीन सुविधांचा समावेश असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.
नवीन फॉर्च्युनर लिजेंडर टेस्ट ड्राईव्हसाठी वासन टोयोटा शोरूम मध्ये उपलब्ध असून, याला लाभ घेण्याचे आवाहन शोरुमच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9604038234 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.