कमी धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करन्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-राहुरी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून नागरिकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असून मनमानी कारभार करणाऱ्या धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील सत्तार शेख यांनी तहसीलदार राहुरी यांच्याकडे केली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, राहुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेमार्फत नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनाअंतर्गत मोफत धान्य वाटप केले जात आहे; परंतु सेवा संस्थेधे धान्य दुकानदार मनमानी कारभार करत आहेत.

बहुतांशी नागरिकांना कमी धान्य देत आहेत. याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ग्रामीण भागातदेखील अनेक ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार अंत्योदय, प्राधान्य यादीतील लाभार्थ्यांना प्रति किलोप्रमाणे धान्यवाटप करत नाही.

सध्या लॉकडाऊनचा कालावधी असून अनेक गोरगरिब व सामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे बिकट आहे. शासनाच्या मोफत धान्यवाटप योजनेत तर अनेक लाभार्थ्यांना एका शिधापत्रिका मागे किमान दोन ते तीन किलो धान्य कमी मिळते.

ज्यांची यादीत नावे नाहीत, अशा लोकांना विकले जाते. याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24