अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- रेडमिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करून पेशंटच्या जीवाशी खेळणारयांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी व अहमदनगर म्हधील ड्रग माफियांनवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय
येथे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद समवेत कैलास सोनवणे, नईम शेख, मोईज शेख, नाजीम सय्यद, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटल येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे ती खूपच चांगली आहे आम्ही त्याचे समर्थन करतो पन छोट्या माश्या पेक्षा अहमदनगर शहरातील ड्रगमाफिया जे आधार कार्ड वर बोगस नावे टाकून त्याच्या नावाचे रेडमिसिव्हर इंजेक्शन चढत्या भावाने विकत आहे
इतक्या उघडपणे हा गोरख धंदा चालू असून हे संघटित गुन्हेगार असून अश्या लोकांनवर मोका अंतर्गत कारवाई करावी भिंगार येथे झालेली कारवाई ही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन ची कारवाई आहे अन्न औषध प्रशासनाला पोलिसांनी बोलवले होते
आपल्या अहमदनगर शहरातील अन्न ओषध प्रशासन मूग गिळून का बसले आहे त्याची सुध्दा या ड्रग माफियान बरोबर भागीदारी आहे असे दिसून येत आहे त्यांनी जाहीर केलेले मोबाईल क्रमांक बंद असून 1 नंबर चालू आहे पन कोणीच फोन उचलत नाहीं
या मुळे हे अधिकारी सुद्धा हया माफियान बरोबर मिळून गोरख धंदे करीत असल्यामुळे त्यांना सुद्धा याच्यात सह आरोपी करण्यात यावे
आणि अहमदनगर म्हधल्या मोठया धेंडानवर त्याच्या मेडिकल गोडाऊन छापे टाकून त्यांची चौकशी करून त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी
व हे इंजेक्शन रुग्णांना दवाखान्यातच उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सय्यद यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी केली आहे.