ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल झावरे यास अटक करण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी राहुल झावरे यास अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रतीक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे, जिल्हा संघटक फिरोज पठाण, प्रवीण ओरे, जितेंद्र कुटे, दिनेश दळवी आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

दि.10 सप्टेंबर 2021 रोजी मिनीनाथ सूर्यभान बर्डे रा तास (वनकुटे) ता पारनेर येथील जिल्हा परिषदेकडून आलेल्या येडू माता मंदिरासाठी सभामंडपास लागणाऱ्या ग्रामपंचायत ठराव मागण्याकरिता वनकुटे गावाचे सरपंच राहुल बबन जावरे यास भेटण्यास पुनर्वसन पाची आंबा येथील दशक्रिया विधी च्या ठिकाणी त्यांच्या बोलण्यावरून गेले असता

येडू माता मंदिरासाठी सभामंडप मंजूर होऊन आलेला आहे त्याकरिता ग्रामपंचायत ठराव आवश्यक आहे म्हणून भेटण्यास आलो असे सांगितलं असता तुला काही भेटणार भिल्ट्या? मला असे म्हणाले व गचांडी धरून कानफटीत मारून अर्वाच्च भाषेत जातिवाचक शिवीगाळ करून व तुला काय करायचे ते कर ठराव तुला देणार नाही

असे म्हणून निघून गेले घटना घडली त्याच दिवशी सायंकाळी कलम 323 504 506 व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला परंतु ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्हा दाखल असताना

सदर आरोपी हा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे निकटवर्तीय असल्याने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थानिक आमदार यांचे कट्टर समर्थक व राष्ट्रवादी तालुका युवा अध्यक्ष असल्याने गेल्या तेरा दिवसांपासून मोकाट फिरत आहे संबंधित आरोपी शनिवारी 18 सप्टेंबर 2019 रोजी वनकुटे गावामध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढत असताना

सदर आरोपी हा पोलिसांसोबत उपस्थित होता त्यामुळे पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका उपस्थित होत आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे कॉल रेकॉर्ड चेक केले तर त्यात आरोपी बरोबरचे संभाषण किती वेळा झाले

हे देखील उघडकीस येईल सदर आरोपीस लवकरात लवकर अटक करण्यात यावी व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व आरोपीस मदत करणाऱ्या इतर पोलिस कर्मचाऱ्यांना देखील आरोपी करण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.