अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीने ठाकूर निमगाववासिय त्रस्त झाले आहेत.
या दारू विक्रीला पायबंद घालण्याची मागणी ठाकूर निमगाव येथील सरपंच सुनिता कातकडे यांनी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाकूर निमगाव येथे मागील काही दिवसांपासून अवैद्य दारु विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
परिणामी गावातील तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यात यावी.
निवेदनावर सरपंच सुनिता कातकडे, आशा शिंदे, सीमा मडके, शिवगंगा कातकडे, योगिता कातकडे, कांताबाई घोरपडे, कमलबाई शिंदे,गोधाबाई निजवे आदींच्या सह्या आहेत.