अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- आता नगर जिल्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीला विदेशातून मागणी वाढली आहे. नगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना विदेशातून मागणी आहे.
नुकत्याच एक हजार मूर्ती लंडनला पाठविण्यात आल्या आहेत. विदेशातून मागणी वाढल्याने दरही चांगला मिळत आहे. पाथर्डी शहरातील मूर्तींना लंडन, थायलंड व मॉरिशस येथून मागणी आहे. लॉकडाउन असतानाही मागणी कमी न होता वाढली आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना चांगली मागणी असून, दरही उत्तम मिळतो आहे. दरम्यान पाथर्डी शहरातील मूर्तिकार रघुनाथ पारखे १९७० पासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. पारखे यांनी या वर्षी एक हजार गणेशमूर्ती लंडन येथे पाठविल्या आहेत.
मागील वर्षी त्यांनी थायलंड व मॉरिशस येथे मूर्ती पाठविल्या होत्या. याबाबत बोलताना पारखे म्हणाले कि, गणेशमूर्तींना बाजारपेठ मिळावी, यासाठी काम करतो.
या वर्षी लंडनमधील अनिवासी भारतीयांकडून एक हजार मूर्तींची मागणी आली होती. ठाणे येथील मित्रांच्या मध्यस्थीने मूर्ती लंडनला पाठविल्या आहे.