अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- शिरूर कासार येथील विशाल कुलथे या सोनाराचा निर्घुण खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राहुरी तालुका सोनार संघटनेचे अध्यक्ष महेश शहाणे यांनी केली.
पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सोने खरेदी करण्याच्या उद्देशाने कुलथे यांना सलूनच्या दुकानात बोलावून गळा दाबून हत्या करण्यात आली.
मृतदेह नगर जिल्ह्यातील भातकुडगाव येथे शेतात नेऊन पुरण्यात आला. मुख्य आरोपी गायकवाड फरार असून
त्याला पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. या निवेदनावर मनोज अंबलवादे, ज्ञानेश्वर मंडलिक यांच्यासह संघटनेच्या सदस्यांच्या सह्या आहेत.