अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- नगर सोलापूर रोडची दुरावस्था खूप मोठ्या प्रमाणात झालेली असून येथील रस्त्याचे पॅचीग काम करण्याच्या मागणीसाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकारी अभियंता संजय पवार यांना निवेदन देताना
श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर समवेत गजानन भांडवलकर, दादासाहेब गव्हाणे, बळीराम खताळ, अक्षय भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
नगर-सोलापूर रस्त्यावर जागो जागी मोठमोठे खड्डे झालेले आहेत त्या रोडणे ये-जा करणे सर्वसामान्यांना अवघड झालेले आहे
रोड वरती झालेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होतात बरेच लोक अपघातामुळे जखमी झाले आहेत काहींना स्वतःचे प्राणही गमवावे लागलेले आहे
सध्या कोरोनाचे संकट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे याची आम्हाला जाणीव आहे परंतु कोरोणाच्या काळात ही रोडच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
त्यामुळे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले व पावसाळ्यापूर्वी नगर सोलापूर रोड सर्व खड्डे बुजवणे आवश्यक आहे व लवकरात लवकर खड्डे बुजवून घ्यावे अन्यथा आपल्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.