कोविड उपचार केंद्र शहराबाहेर हलवण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-  व्यापारी गाळे असलेल्या व निवासी परिसरातील इमारतीत सुरू करण्यात आलेले कोविड उपचार केंद्र शहराबाहेर हलवावे, अशी मागणी नवी पेठ, नागेश्वर गल्ली, नागेश्वर वसाहतीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे केली.

यासंदर्भात कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयात उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

निवेदनावर नगरसेविका शशिकला शेरकर, डॉ. नरेंद्र मुळे, कल्याण थोरात, योगेश वाघ, आकाश राऊळ, संदीप पुराणीक, बापूसाहेब हांडे, पत्रकार उदय शेरकर, सागर बोरूडे आदींसह या परिसरातील सुमारे दीडशे नागरिक, व्यावसायीकांच्या सह्या आहेत.

येथील ग्रामीण रुग्णालयात जागा अपुरी असल्याचे कारण देत नवी पेठेतील पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात असलेल्या समर्पित कोविड उपचार केंद्राचे (डीसीएचसी) हे विस्तारीत कोविड उपचार केंद्र आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24