अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ३५ व म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर खरेदीदर लागू करण्यासाठी सोमवारी क्रांतीदिनी कळस बुद्रूक व सुगाम बुद्रूक येथे दूध उत्पादकांंसह समर्थक कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध केला.
रस्त्यावरील दगडाला दुधाचा अभिषेक घालत जोरदार निदर्शने केली. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अजित नवले, विजय वाकचौरे, राजेंद्र भांगरे, विकास वाकचौरे, खंडू वाकचौरे, प्रकाश देशमुख, सुनील देशमुख, बाबाराजे देशमुख, माणिक देशमुख, बापूसाहेब वाकचौरे,
प्रदीप देशमुख, रवींद्र जगदाळे, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब उगले आदींनी केले. काॅम्रेड डॉ. अजित नवले म्हणाले, कोरोना काळात लाॅकडाऊनचा कांगावा करीत राज्यातील दूध खरेदीदार कंपन्यांनी दुधाचे दर १५ रुपयांनी पाडून शेतकऱ्यांची लूट केली.
दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी संघटना व दूध कंपन्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली. एफआरपीनुसार दूध दर लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने प्रस्ताव बनवून महसूल व सहकार विभागात कॅबिनेटकडे अभिप्रायास पाठवला.
या बैठकीनंतर दूध दर वाढतील व राज्यात दुधास एफआरपीचा कायदा लागू केला जाईल, असे आश्वासनही दिले. मात्र प्रत्यक्षात दीड महिना उलटून गेला तरीही दूध दर वाढवण्यात आले नाही.
काॅम्रेड डॉ. अजित नवले म्हणाले, कोरोना काळात लाॅकडाऊनचा कांगावा करीत राज्यातील दूध खरेदीदार कंपन्यांनी दुधाचे दर १५ रुपयांनी पाडून शेतकऱ्यांची लूट केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी शेतकरी संघटना व दूध कंपन्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली.
एफआरपीनुसार दूध दर लागू करण्यासाठी दुग्धविकास विभागाने प्रस्ताव बनवून महसूल व सहकार विभागात कॅबिनेटकडे अभिप्रायास पाठवला.
या बैठकीनंतर दूध दर वाढतील व राज्यात दुधास एफआरपीचा कायदा लागू केला जाईल, असे आश्वासनही दिले. मात्र प्रत्यक्षात दीड महिना उलटून गेला तरीही दूध दर वाढवण्यात आले नाही.
लॉकडाऊन काळात दूध कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून २० रुपयांनी दूध खरेदी केले. शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे. दूध उत्पादकांची लूटमार थांबवण्यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल,
असा लूटमार विरोधी कायदा करावा, दूध उत्पादकांच्या या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने हे आंदोलन केले.