लॉकडाऊनमधील व्याज माफ करण्याची मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- लॉकडाऊन वाढतच आहे. यावेळी सरकारकडून दिलासा देण्यासाठी बँकांची कर्जवसुली थांबवून, लॉकडाऊनच्या काळातील व्याज माफ करावे,

अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख तथा कोपरगाव आगार एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे यांनी केली आहे.

यासंदर्भात मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, की भारतासह महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे अत्यावश्यक सेवा वगळता मागील महिनाभरापासून इतर सर्व व्यवसायांना टाळे लागले आहे. लहान मोठे सर्वच व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक उलाढाल बंद झाली आहे.

या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहे. तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना कर्जाचे हप्ते कसे भरायचे? असा प्रश्न पडला आहे. कामगार व तेथील मालक, खासगी विनाअनुदानित शाळा, शिक्षक, शिकवणी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.

असे असले तरी बँकांच्या मासिक हप्ते वसुलीवर कोणतेही निर्बंध लावले नसल्यामुळे महिला बचत गट, व्यवसायासाठी घेण्यात आलेले कर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज आदींची मासिक हप्­ता वसुली जोरात सुरू आहे.

हाताला कामच नसल्यामुळे बँकांचे हप्­ते कसे भरावे? असा प्रश्­न सर्वसामान्य ते बडे व्यापारी यांच्या समोर उभा आहे. लॉकडाऊन १ जूनपर्यत वाढण्याची शक्यता आहे. नियमित सुरू असलेला बँक हफ्ता वसुलीचे काय? यावर सरकार बोलायला तयार नाही.

सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेचा विचार करून लॉकडाऊन वाढवले म्हणून जनता सुरक्षित होऊ शकत नाही. त्यासोबत असणाऱ्या इतर आर्थिक बाबींचा विचार शासनाने करणे आवश्यक असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24