नगर शहरातील खड्ड्यांना कारणीभूत असलेल्यांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- शहरातील खड्डेमय रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने यामुळे अपघात होतात. ते नगरकरांच्या जिवावर बेततात. याला सर्वस्वी मनपा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार आहेत. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी शिवसेनेने सर्वांना चांगलेच धारेवर धरले.

तोफखाना पोलिस ठाण्यात युवा सेना प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर उपस्थित होते. त्यांनी पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्यासमोर पालिका, पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि ठेकेदार कोठारी यांना जाब विचारला.

शहरातील रस्त्यांची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. त्यात दिल्लीगेट रस्ता तर ठेकेदाराने रस्त्याचे काम अपूर्ण ठेवला. त्यामुळे रस्तावर वारंवार वाहतुकीची कोंडी व अपघात होतात. याची पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीच दखल घेतली नाही.

त्यामुळे अधिकारी तसेच ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाणे गाठले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24