अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दिड वर्षांपासून राहुरी शहरातील आठवडे बाजार बंद आहेत. परिणामी आठवडे बाजारकरूंवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे आठवडे बाजार संघटनेकडून आठवडे बाजार चालू करण्यासाठी तहसीलदार फसिओद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, सुमारे दिड वर्षांपासून भारतात कोरोना महामारीने थैमान घातले.
या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लाॅकडाऊन जाहीर केले. सरकारच्या आदेशाचे पालन करत आठवडे बाजारकरूंनी बाजार बंद ठेवले. ती आजपर्यंत बंदच आहेत. बाजार बंद इतर कोणताही कामधंदा नाही.
त्यामुळे आता बाजारकरूंवर उपासमारीची वेळ आली आहे. बाजारकरुंचा प्रपंच आठवडे बाजारावर अवलंबुन असल्याने आठवडे बाजाराला लागणारा माल हा कर्ज काढून भरतात. आता ते कर्ज फेडण्या करीता पैशाची आवश्यकता असून सध्या बाजार बंद आहेत.
त्यामुळे प्रपंचाची काळजी लागून काही बाजारकरू आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. अशी परिस्थिती निर्माण झाली. सरकारने यापुर्वी रिक्षा चालक, बांधकाम मजुर तसेच इतर काही हातावर पोट भरणाऱ्या लोकांना मदत स्वरुपात राज्य सरकारने व केंद्र सरकारने मदत केलेली आहे.
त्या प्रमाणेच आठवडे बाजरकरुंना देखील मदत दयावी. तसेच आठवडे बाजार लवकरात लवकर सुरु करणे बाबत विचार व्हावा. तालुक्यातील ग्रामीण भागात काही वेळा पुरते आठवडे बाजार चालू झाली आहेत.
त्यामुळे शहरातील आठवडे बाजारला परवानगी द्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनावर आठवडे बाजार संघटनेचे तालुकाध्यक्ष सलिमभाई शेख, उपाध्यक्ष गौतम साळवे, सचिव सोपान कातोरे,
खजिनदार विकास काशिद, कृष्णा शिरसाठ, अशोक काशिद, गोरख तांबोळी, संजय नांगरे, प्रभाकर काशिद, गोरख लांडगे, नवनाथ तांबोळी, मोसीम आतार,
पप्पू बोरा, मतीन शेख, भगवान साठे, राजू नारद, माज आतार, निसार सय्यद, आसिफ शेख, अच्युत नेवासकर, जिशान आतार, फारूक आतार, जावेद सय्यद, सद्दाम आतार, राजू आतार आदिंच्या सह्या आहेत.