अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअर हॉस्पिटल येथील आरोग्य अधिकारी राहुल ठोकळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर ककड कारवाई करावी, अशी मागणी सिटी स्क्वेअर हॉस्पिटलच्यावतीने करण्यात आली आहे.
याप्रकरणी संचालक डॉ.संदिप सुराणा यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले यावेली हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.संदीप सुराणा म्हणाले की रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात डॉक्टर ठोकळ यांचा हात फॅक्चर झाले असून
त्यांना 30 टाके पडले आहेत त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.