कोरोनापासून रक्षण करण्यासाठी भूते सरसावली …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वृत्तसंस्था :- इंडोनेशियातल्या गावांचे कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी भूते सरसावली आहेत. या भूतांना ‘पोकाँग’ असे म्हटले जाते. संध्याकाळपासूनच जावा बेटांवरील कापूह गावात या भूतांचा वावर सुरू होतो.

त्यामुळे वयस्कर नागरिक कुटुंबातल्या इतर सदस्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखतील. ही भूते खरोखरची नसून, ती माणसेच आहेत. पांढऱ्या वस्त्रांमध्ये गावातली तरुण मंडळी पोलिसांना संध्याकाळनंतर होणाऱ्या गर्दीला रोखण्यास मदत करतात.

इंडोनेशियामध्ये पोकाँग म्हणजे मृत शरीरात अडकलेला आत्मा. देशात पोकाँगवर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग आहे. खास करून वयोवृद्ध नागरिक या भूतांना मानतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24