अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे पाच महिन्यांपासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित? या जि.प सदस्याचा गंभीर आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  कोरोनामुळे लॉकडाऊन व नंतरच्या काळात अशा एकूण आठ नऊ महिने शाळा बंद होत्या. त्या काळात पोषण आहार वाटला असे कागदावर दिसते. परंतु प्रतक्ष वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे. आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे.

परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही अधिकारी सांगतात की ठेकेदारांची मुदत नोव्हेंबरला संपली. मग नोव्हेंबरला वाहतुकीच्या ठेकेदारांची मुदत संपणार होती. मग त्याचे नियोजन आधीच का केले नाही. नियमाने एक दिवस सुद्धा एकही विद्यार्थी पोषण आहारा पासून वंचित ठेवता येत नाही मग आता पाच महिन्या पासून वंचित राहिले.

याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार?असा गंभीर आरोप जिल्हा परिषदेचे सदस्य तथा भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. गोर गरीबांच्या मुलांसाठी आलेला पोषण आहाराचा १०७ मेट्रिक टन तांदूळ गोदामात पडून आहे, तो आता सडून जाईल.

खराब होईल याला जबाबदार कोण. आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रम्ह मग याची अशीच नासाडी होऊन द्यायची का? त्या मुळे तातडीने पोषण आहार मुलांना मिळेल असे नियोजन अधिकारी,पदाधिकाऱ्यांनी करावे व नेहमीप्रमाणे न वाटलेल्या पोषण आहाराची बिले निघणार नाही याची काळजी घ्यावी.अशी मागणी त्यांनी केली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24