आरोपींविरुद्ध दोनदा तक्रार करूनही तोफखाना पोलिसांकडून कारवाई नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- संपत्तीच्या कारणातून भावकीमध्ये वाद निर्माण झाला वाद कोर्टात गेला. मात्र निकालापूर्वीच एकाकडून दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.

यापासून सुटका मिळावी म्हणून पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या मात्र तरीही न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंब हतबल झाले आहे.

विनाकारण त्रास देणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसात दोनदा तक्रार दाखल करूनही पोलिसांकडून आरोपींवर कारवाई होत नाही.

त्यामुळे हे आरोपी आणखी त्रास देत असल्याची तक्रार बोल्हेगाव येथील दिव्यांग महिलेने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

सरला नामदेव मोहोळकर (वय ३५, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, मी अपंग असून पती व दोन मुलींसोबत बोल्हेगाव येथे राहते.

माझे पती व त्यांच्या भाऊबंदामध्ये वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद आहे. त्याबाबत पतीने न्यायालयात दावा दाखल केला असून त्याचा रा. मनात धरत छाया वामन मोहळकर,

संतोष बाबासाहेब मोहोळकर, सोनाली बनकर, अक्षय वामन मोहोळकर यांनी आपणास व पती यांना बेदम मारहाण केली.

याबाबत १६ जानेवारी व २१ मे असे दोनदा तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही. त्यामुळे या आरोपींपासून आमच्या जीवितास धोका आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24