अतिरिक्त भार असतानाही पोलिसांकडून अविरतपणे गुन्ह्यांची उकल सुरुच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :-  सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्येही पोलिस अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. कोरोनामुळे पोलिसांवर अतिरिक्त भार असतानाही विविध गुन्ह्यांची उकल करण्याचेही काम ते अविरतपणे करत आहेत,असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने नगर तालुका पोलिस स्टेशनची नुकतीच जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस स्टेशन म्हणून निवड केली. त्याबद्दल नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे बोलत होते. उद्धव शिंदे म्हणाले,नगर तालुका पोलिस स्टेशनच्या माध्यमातून सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी उत्कृष्ट काम केले असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर तालुका पोलिस स्टेशनची उत्कृष्ट पोलिस स्टेशन म्हणून निवड करत त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांचे कार्य कौतुकास्पद आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप म्हणाले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी आमच्यावर विश्वास दाखवत नगर तालुका पोलिस स्टेशनची उत्कृष्ट पोलिस स्टेशन म्हणून निवड केली आहे.

यापुढील काळातही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व अधिकारी व पोलिस कर्मचारी आधिक चांगले काम करून आमच्यावरचा विश्वास सार्थ करून दाखवू. यावेळी उपनिरीक्षक धनंजय जारवाल,

सहा.फौ.लबडे, घोरपडे, वनवे,हेमंत ढाकेफळकर, सचिन पेंडुरकर, संकेत शेलार व सर्व नगर तालुका पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24