अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यात यापूर्वी दडपशाहीचे राजकारण करण्यात येत होते. परंतु आमच्याकडून फक्त विकासाचा दृष्टिकोन ठेवूनच राजकारण सुरू आहे. मात्र आमच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग बंद करावेत.(Prajakt Tanpure)
पराभव झाला तरी समज आली नाही, असा टोला ना. तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी ना. तनपुरे म्हणाले की, दडपशाही न करता विकास कामे व प्रेमाने माणसे जोडण्याचे काम करत आहे. सत्तेचा दुरुपयोग कधीही करणार नाही.
आमच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु मी न केलेल्या गुन्ह्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे.
आमचा कार्यकर्ता चुकीचा असेल तर त्याला पाठीशी घालण्याचे काम होणार नाही. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग बंद करावेत. पराभव झाला तरी समज आली नाही, असा टोला नामदार तनपुरे यांनी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.
मागील सरकारच्या काळात महावितरण कंपनीला अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे तीस ते चाळीस हजार कोटींची थकबाकी वाढली. थकबाकीमुळे महावितरण कंपनीला पगारासाठी कर्ज काढावे लागले.
त्याच्या व्याजाचा बोजा आपल्यावरच पडत आहे. महावितरण कंपनीची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून, त्यास मागिल सरकारच जबाबदार आहे. मात्र आज भाजपवाल्यांची फक्त नौटंकी सुरू आहे.
रोहित्र बंद करण्यात आल्याबाबत तनपुरे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिरायत भागात प्रत्येकी सहा हजार रुपयांचा विषय सोडून चालू बिल भरणा करून रोहित्र सुरू करण्याचे आदेश दिले.