अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध निधींमधून नेवासे तालुक्यात विविध विकास कामे पूर्णत्वास जात आहेत. गुणवत्तापूर्ण विकासकामांतून होणार परिसराचा विकास हाेईल, असे प्रतिपादन उदयन गडाख यांनी केले.
सलाबतपूर गणातील खेडलेकाजळी येथील रस्ता खडीकरण १५ लाख रुपये, जळके खुर्द येथील नदीकडील रस्ता खडीकरण ५ लाख, साखळडोह रस्ता खडीकरण १५ लाख रुपये, गोगलगाव येथील रस्ता खडीकरण ३० लाख असे एकूण ६५ लाख रुपयांच्या विविध रस्ता विकास कामांचे युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले.
यावेळी उदयन गडाख म्हणाले, सलाबतपूर परिसरातील जळके, खेडले काजळी, गोगलगाव परिसरावर मंत्री शंकरराव गडाख व प्रशांत गडाख यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे गावांतील रस्ता विकास कामांना मंजुरी दिली. त्यानुसार वरील विकास कामे दोन महिन्यांपूर्वी पूर्णत्वास आले.
यापुढेही शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जळके खुर्द, खेडलेकाजळी, गोगलगाव परिसरात सातत्यपूर्ण विकासकामांसाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. नेवासे पंचायत समितीच्या वतीनेही खेडले काजळी येथे हनुमान मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे तसेच जळके खुर्द येथे नागरिकांना बसण्यासाठी बाकडे आदी कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बेळपिंपपळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, संचालक बाळासाहेब परदेशी, सलाबतपूर गणाचे पंचायत समिती सदस्य कैलास झगरे, संदीप सुडके सरपंच प्रवरासंगम, भगवानराव कर्डिले सरपंच गिडेगाव, राजू गोलांडे सरपंच गोधेगाव, भीमाशंकर वरखडे उपसरपंच मुरमे,
दिलीपराव मते सरपंच गोगलगाव, बाळासाहेब कोरडे सरपंच खेडले काजळी, राजेंद्र पंडित सरपंच जळके खुर्द, संजय शिंदे, रशीद पठाण, इस्माईल पठाण, इक्बाल शेख, दिलीप मते, दिनकर उदे, अंबादास कोरडे, महेश औताडे, खंडेराव उदे, वसंत कांगुणे, सागर रोटे,
गणेश भोरे, प्रल्हाद मते, हनिफ शेख, विवेक मते, ईश्वर मते, प्रकाश चावरे, नितीन दहातोंडे, पोपटराव मुठे, रायभान कोरडे, संतोष कोरडे, नंदू कोरडे, रामकिसन कोरडे, पप्पू म्हस्के, आबासाहेब मते, संजय चावरे, तय्यब पठाण आदी उपस्थित होते.