अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- दहा वर्षांपासून थकीत देयके देण्यास टाळाटाळ केल्यामुळे ठेकेदार संघटनेने मंगळवारपासून (३० नोव्हेंबर) कामबंद आंदोलन पुकारले आहे.
मागण्या मान्य होईपर्यंत मनपा हद्दीत सुरू असलेली विकासकामे बंद ठेवण्याचा निर्णय ठेकेदारांनी घेतल्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प होणार आहेत.
ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आनंद पुंड, गणेश साळुंके, शहाबाज शेख, नाजीर शेख, जहीर शेख, अंबादास चाैधरी, चंद्रकांत म्हस्के, अमृत नागूल, अविनाश लोंढे, रिजवान सय्यद, ज्ञानेश्वर जंगम, सर्फराजसय्यद,
अमृत वन्नम, सचिन सापते आदींनी आयुक्तांना पत्र दिले आहे. महापालिका हद्दीत २०११ पासून केलेल्या विविध विकासकामांची बिले थकीत आहेत.
तसेच काही देयके लेखा विभागातून गहाळ झाली आहेत. अनामत रकमेचे अधिकार शहर अभियंत्यांना द्यावेत,
मुलभूत सुविधा रकमेत ३० टक्के मनपा हिस्सा जमा करावा, या मागणीसाठी पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने ठेकेदारांनी कामबंद करण्याचा पवित्रा घेतला आहे.