शहरातील विकासकामेच बनू लागली सर्वसामान्यांसाठी अडथळ्याची कारणे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  शहरात अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुररूस्तींची कामे सुरु आहे तर अनेक ठिकाणी भूमिगत गटारे करण्यासाठी मनपाकडून खोदकाम सुरु आहे.

मात्र आता मनपाच्या याच काही कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेने शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारीचे काम हाती घेतले आहे. रस्ते खोदून त्यात काळे पाइप टाकले जात आहेत.

हे काम गेल्या मार्चपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते जुनी महापालिका कार्यालय मार्गावर पाइप टाकून झाले आहेत.

हे काम होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. पाइप टाकून झाल्यानंतर, रस्त्याचा खोदलेला भाग बुजविणे, त्यावर खडी आणि नंतर डांबरीकरण, ही कामे करणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदाराने खोदलेले रस्ते चार महिने उलटूनही बुजविले नाहीत.

त्यामुळे रस्त्यावर कमालीची धूळ झाली आहे. तसेच या रस्त्यावर खाडी पसरलेली आहे, व विशेष म्हणजे, ही खडी पूर्णपणे मोकळी आहे.

वाहनांमुळे खडी रस्त्यावर पसरली गेली असून, त्यावरून वाहने घसरत आहेत. मनपाच्या अभियत्यांनीही याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24