विकासात्मक व्हिजने प्रभागातील प्रश्न सोडविले जातात – महापौर बाबासाहेब वाकळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- प्रभाग क्र.६ मधील भुतकरवाडी अंतर्गत श्री कॉलनी येथे नगरसेविका वंदना ताठे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण व बंद पाईप गटारं कामाचा शुभारंभ महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी नगरसेविका वंदना ताठे, पल्लवी जाधव, सभापती रवींद्र बारस्कर, विलास ताठे, ईश्वर तोडमल, राजू तोडमल, माधुरी देशपांडे, अनुप धोडपकर, संजय जोशी, निलेश शिंदे, पियुष कुलथे, ईश्वर पडोळे, हर्षल शिंदे, भगवान देशपांडे, सचिन पाठक, राजेंद्र सुपेकर आधी सर्व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की नगरसेविका वंदना ताठे यांनी विकासात्मक कामांनी प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलला आहे नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ते नेहमी कार्यतत्पर असून नागरिकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते कार्यरत आहे.

व प्रत्येक प्रभागांमध्ये विकासात्मक व्हिजने प्रभागातील प्रश्न सोडवले जात आहे अनेक वर्षापासून ची ड्रेनेज लाईन जीर्ण झाली होती उघड्या गटारीनी स्वच्छता व दुर्गंधीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत होता तर चांगला रस्ता नसल्याने

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होत होती याची दखल घेत रस्ता कॉंक्रिटीकरण व बंद पाईप गटारीचे काम मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्परता दाखविणारे नगरसेविका वंदना ताठे यांचा नागरिकांच्या वतीने यावेळी सत्कार देखील करण्यात आला.

अहमदनगर लाईव्ह 24