ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीस शतरंज का बादशहा, आता सरकारलाही इशारा…

Published by
Ahmednagarlive24 Office

जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांनी आज जालन्यातील (Jalana) जलाक्रोश मोर्चात (Jalakrosh Morcha) सहभाग घेत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, देवेंद्र फडणवीस हा शतरंज का बादशहा आहे. आपण त्यांना उत्तम संसदपटू म्हणतो. शी चौसर खेळल्या गेली राज्यसभेच्या निवडणुकीत की… आपल्याकडे मतं कमी होते, त्यांच्याकडे मतं जास्त होते.

अशाही परिस्थितीत आपला शतरंज का बादशहा यशस्वी ठरला. भाजपचा उमेदवार विजयी झाला. आपल्या आग्रहासाठी ते येथे आलेत. मुख्यमंत्री असताना 6 वेळेस जालन्यात आले.

आधी 2011 मध्ये 2 लाख ८५ हजार एवढी जालन्याची लोकसंख्या होती…. आता चार लाख लोकसंख्या आहे. 58 एमएलडी पाणी आमच्या शहराला लागतं.आज 15 एमएलडी पाणी येतंय.

पण आया बहिणी रस्त्यावर येणारच… म्हणून आम्ही सरकारला इशारा देतोय. हा मोर्चा केवळ भाजपाचा नाही. चेहरा आमचा आहे. पण आमच्या पाठिशी जालनेकर आहेत. या मोर्चाची दखल सरकारनं घेतली पाहिजे. वरुणराजाही आज आमच्यासोबत आहे असे दानवे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, आम्ही विरोधी पक्षात असलो तरी नागरिकांच्या मागणीला आम्ही प्रतिसाद दिला.

आता सरकारलाही इशारा देतो की, आमचे प्रश्न सोडवले पाहिजेत. लोकांमध्ये असंतोष आहे. 2019 मध्ये अमित शहा यांनी सांगितले होते. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील मात्र निकाल लागल्यावर शिवसेना बदलली.

आधीच्या सरकारने सुरु केलेल्या योजना यांनी बंद केल्या. आता प्रत्येक निवडुकीत फटके मारल्या शिवाय गप्प बसायचं नाही. आपलं सरकार असता तर समृध्दी महामार्ग सुरू झाला असता. पुढच्या काही दिवसात 100 कोटी खर्च करून रेल्वे मार्ग करणार. हा असंतोष मतपेटी तुन व्यक्त करावा, असेही ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office