अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेला शेअर बाजार आज दिवसाच्या सुरुवातील चांगलाच गडगडला होता. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच धाकधूक झालेली पाहायला मिळाली.
परंतु दिवस जसजसा वाढला तसतसा बाजारात खालच्या पातळीवरुन चांगली वसुली झाली. व्यापार संपल्यानंतर Sensex-Nifty फ्लॅटमध्ये बंद झाला. मुंबई स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी 178.65 अंक म्हणजेच 0.34 टक्क्यांनी घसरून 52323.33 वर बंद झाला.
त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टीही गुरुवारी 76.10 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी घसरून 15691.40 वर बंद झाला. अदानी पोर्टचे शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले दिग्गज शेअर्स मध्ये अदानी पोर्ट्स, बजाज ऑटो, हिंदुस्तान युनिलिव्हर,
भारती एअरटेल आणि ग्रासिम यांचे शेअर्स ग्रीन मार्कवर बंद झाले. तर दुसरीकडे ओएनजीसी, कोल इंडिया, जेएसडब्ल्यू स्टील, एनटीपीसी आणि यूपीएलचे शेअर्स रेड मार्कवर बंद झाले. एफएमसीजी, फायनान्स सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट बँक वगळता सर्वच सेक्टर्स रेड मार्कवर बंद झाले.
यात आयटी, पीएसयू बँक, फार्मा, मेटल, ऑटो, बँक, रियल्टी आणि मीडियाचा समावेश आहे. यापूर्वी गुरुवारी Sensex 178.65 अंकांच्या घसरणीसह म्हणजेच 0.33 टक्क्यांनी 52323.33 वर बंद झाला. त्याचबरोबर Nifty गुरुवारी 76.10 अंकांनी किंवा 0.48 टक्क्यांनी घसरून 15691.40 वर बंद झाला.