नवनिर्वाचीत उपसरपंच व तलाठ्यांमध्ये ढिशुम ढिशुम…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  गाव पुढारी व सरकारी बाबू यांच्यामध्ये कोणत्या न कोणत्या कारणावरून मतभेद असतातच. मात्र जिल्ह्यातील एका ठिकाणी तर एका पुढाऱ्याने चक्क तलाठ्यालाच चोप दिल्याची घटना घडली आहे.

पारनेर तालुक्यातील निघोजच्या नवनिर्वाचीत उपसरपंच ज्ञानेश्वर विठ्ठल वरखडे यांनी निघोजच्या तलाठ्याला मारहान केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे.

या बाबत तलाठी विनायक निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी कि, निघोजचे उपसरपंच यांचा एक कार्यकर्ता तलाठी निंबाळकर यांच्याकडे काम घेवून गेला व म्हणाला मला सरपंचाने पाठवले आहे,

माझे काम करा, तेव्हा तलाठी म्हणाले तुम्हाला थांबावे लागेल माझ्या समोर काम चालू आहे. ही घटना उपसरपंच यांना कार्यकर्त्यांने फोनवर सांगताच ,

उपसरपंच वरखडे यांनी तलाठी कार्यालयात प्रवेश करून निंबाळकर यांना शिवीगाळ करुन मारहान केली. याबाबतचा गुन्हा तलाठी निंबाळकर यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

त्यानंतर पारनेर पोलिसांनी तातडीने आरोपी ज्ञानेश्वर वरखडे याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24