अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कोरोना कालावधीमधील लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद ठेवण्यात आले होते. त्यातच, पुढील सामन्यांसदर्भात निश्चिती नसल्याने धोनीने आपली निवृत्ती जाहीर केली होती.
मात्र, धोनीसारख्या महान क्रिकेटपटूने अशी ट्विटरवरुन निवृत्ती जाहीर करणे चाहत्यांना आवडले नाही.
त्यामुळे, धोनीच्या निवृत्तीसाठी बीसीसीआयने एक सामना घ्यावा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांनी केली होती.
अखेर, बीसीसीआयने या मागणीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे, लवकरच धोनी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार आहे.
महेंद्रसिंह धोनीला आंतरराष्ट्रीय सामन्यातून निरोप देण्यासाठी एकदिवसीय सामना खेळवण्यात येणार आहे.
आयपीएल सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे.
हा एकदिवसीय सामना डे-नाईट असणार आहे धोनीनेही संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून भारतीय संघाची जर्सी परिधान करण्यासाठी आपण वाट पाहू शकत नाही,
असे माहीने म्हटलंय. तर, कर्णधार विराट कोहलीनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. धोनीच्या नेतृत्वात खेळण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, असेही विराट म्हणाला.